Ticker

10/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

Poisonous Snake|साप प्रकार,गैरसमजुती,विष कसे बनते,चव,प्रतिविष कधी.

विषारी सापांचे प्रकार  
विषबाधेची लक्षणे  
सापाबद्दलच्या गैरसमजुती
सापाचे महत्व 
विषाची चव कशी असते?  
सर्पदंश कसा टाळावा?  
विष नक्की कसे बनते?   
सर्पदंशावरील प्रतिविष कधी दयावे ?  
विषारी सापाबदल या पुढील गोष्टी माहित असल्याच पाहिजे!

साप हा सरपटणारा प्राणी आहे. सापांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचे हात अथवा पाय नसतात. उत्क्रांतीमध्ये त्यांचे हात पाय हे केवळ सांगाड्यावरील भाग म्हणून राहिले आहेत. त्यांना हातपाय नसल्याने ते जमिनीवर नागमोडी आकारात सरपटतात.


विषारीबिनविषारी आणि निमविषारी असे सापांचे ३  प्रकार आहेत. 
आपण केवळ विषारी सापांबाबत जाणून घेऊयात.


विषारी साप

नाग  (Kobra)– नागाचे महत्वाचे लक्षण म्हणजे त्याचा फणा होय. हा साप ‘इलॅपिडी’ या सर्पकुलातील आहे. माँबा वगैरे प्राणघातक विषारी साप याच कुलातील आहेत. नागाच्या मानेवार लांब बरगड्या असून त्यांना स्नायू जोडलेले असतात. मानेच्या स्नायूंच्या संकोचनाने दोन्ही बाजूंच्या बरगड्या फाकतात त्यावरील त्वचा ताणली जाऊन फणा तयार होते. नागाला भीती वाटली किंवा तो चवताळला तर तो फणा काढतो. नागाच्या फणेवर काही खुणा आढळतात.

वास्तव्य - कित्येकांच्या फणेच्या वरच्या पृष्ठावर १० सारखा आकडा असतो या प्रकारचे नाग "महाराष्ट्रात" सर्वत्र आढळतात. फणेवर अंडाकार काळी खूण असून ती पांढऱ्या दीर्घवर्तुळाने वेढलेली असते अशा प्रकारचे नाग "बंगाल" मध्ये आढळतात. काही नागांच्या फणेवर कोणतीही खूण नसते. या प्रकारचे नाग कच्छ, राजस्थान, काठेवाड आणि मध्य भारतात आढळतात. नाग घनदाट जंगलात आढळतो, त्याचप्रमाणे मनुष्यवस्तीतही तो माळरानात, शेते, बागा, कुंपणे इत्यादी ठिकाणी तो असतो. पडलेली घरे, मंदिर, मशिदी इत्यादी जागी तो दिसतो.

रचना -  नाग इतर सापांप्रमाणेच वरचेवर कात टाकतो. कात टाकण्याच्या सुमारास तो अगदी सुस्त होतो. डोळ्यावर कात आल्यामुळे त्याला दिसत नाही. पूर्ण वाढ झालेल्या नागाची लांबी १८० सेंमी.पर्यंत असते. नराची लांबी मादीपेक्षा जास्त असते. कधीकधी विशेषतः पावसाळ्याच्या सुरुवातीला सोनेरी रंगाचे नाग दिसतात, पण त्यांचा हा रंग टिकाऊ नसून सूर्यप्रकाशाने बदलून लवकरच तपकिरी किंवा गव्हाळी होतो.

खाद्य - उंदीर, घुशी, बेडूक हे नागाचे भक्ष्य आहे कधीकधी तो पक्षी, पक्ष्यांची अंडी, खारी, कोंबडीची पिल्ले, पाली, सरडे खातो. क्वचित एक नाग दुसऱ्या नागाला खातो. भर वस्तीमध्ये बहुधा रात्रीच तो आपले भक्ष्य शोधण्याकरिता बाहेर पडतो

शत्रू -  घारी, मुंगूस हे नागाचा कट्टर शत्रू आहेत. नाग आणि मुंगूस यांच्या लढाईत मुंगूस नागाला ठार करते. मुंगसाच्या अंगावरील लांब, दाट व राठ केसांमुळे नागाचे विष मुंगसाच्या अंगात जाऊ शकत नाही.

नाग स्वभावतःच भित्रा असल्यामुळे आपण होऊन माणसावर हल्ला करून चावत नाही. तो भ्याला किंवा संतापला म्हणजे जोराने फुसकारे टाकतो. चावण्याच्या वेळी आपल्या शरीराचा पुढचा भाग उभारून, डोके थोडे मागे घेऊन तो एकदम प्रहार करून दंश करतो. दंश आणि विषाचे अंतःक्षेपण या क्रिया क्षणार्धात होतात. दंशक्रियेच्या वेळी विष ग्रंथीवर स्नायूंचा दाब पडून विष विषदंताच्या मार्गाने शरीरात शिरते. नागाच्या विषावर अँटिव्हेनिनाचे अंतःक्षेपण (इंजेक्शन) हाच एक खात्रीलायक उपाय आहे.मण्यार (Indian krait) – मण्यार किंवा मणेर ही भारतात आढळणाऱ्या चार प्रमुख विषारी सापांपैकी एक जात आहे. साधा मण्यार, पट्टेरी मण्यार व काळा मण्यार या तीन जाती भारतात आढळतात. मण्यारच्या १० उपजाती देखील आहेत. मण्यारचे विष नागाच्या विषाच्या १५ पटीने जहाल असते. यामुळे याचा दंश झाल्यापासून ६ ते २४ तासांत माणूस दगावतो. मण्यार चावल्यावर लवकरात लवकर वैद्यकीय मदत मिळणे गरजेचे आहे. मण्यार चावल्यानंतर कधी कधी हा साप चावल्याचेही लक्षात येत नाही. प्रचंड तहान लागते, श्वास घेण्यास त्रास होतो, पोटदुखी सुरु होते. काही काळाने मेंदूद्वारे नियंत्रित होत असलेली श्वसनप्रणाली बंद पडून मृत्यू देखील होऊ शकतो.

वास्तव्य - भारतात पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांत साधा मण्यार आढळतो. तो वनांत राहणे पसंत करतो. घराच्या जवळपास, बागेत, गवतात, झुडपात, पडक्या इमारतीत इ. ठिकाणी मण्यार आढळतो. उन्हाळ्यात तो पाण्याच्या डबक्याजवळ दिसतो.

रचना - पूर्ण वाढ झालेल्या मण्याराची लांबी ९०–१५० सेंमी. किंवा अधिक असते. शरीर पोलादी निळ्या रंगाचे असून त्यावर सुमारे ४० पांढरे पट्टे असतात. हे पट्टे एकेकटे किंवा जोडीने असतात आणि ते डोक्यापासून शेपटीपर्यंत असतात. पोटाकडची बाजू पांढरी असते. पाठीवर मध्यभागी मोठ्या आणि षट्‍कोनी खवल्यांची एक लांब ओळ असते. हे खवले शेपटीकडे अधिक आणि डोक्याकडे कमीकमी होत जातात.शेपटी निमुळती व गोलाकार असते.

खाद्य - लहान साप, उंदीर, पाली, सरडे व बेडूक यांसारखे लहान प्राणी तो खातो. तो मुख्यत: निशाचर आहे. अन्न शोधण्यासाठी तो रात्री हिंडतो. तो दिवसा सहजासहजी बाहेर पडत नाही. मण्यारची मादी एप्रिल-मे महिन्यात १२–१४ पांढरी अंडी पाचोळ्याच्या ढिगात घालते आणि पिले बाहेर पडेपर्यंत अंड्यांजवळ राहते. पिले साधारणपणे ४५–६० दिवसांनी अंड्यांबाहेर पडतात. नवजात पिले १५–२० सेंमी. लांब असतात.

प्रतिविष बनवण्यासाठी याच्या विषाचा उपयोग होतो.
फुरसे  (Saw-scaled viper) –फुट दिड फूट लांब वाढणारा हा साप व्हायपर जमातीतला.

वास्तव्य - भारतात जवळजवळ सगळीकडे हा विषारी साप आढळतो. मैदानी प्रदेशात तो राहतो. उंचीवरही तो आढळला आहे. कोकणात या सापाचं प्रमाण जास्त आढळतं.ओसाड व रेताड प्रदेश बांबूची बेटं आणि खडकाळ डोंगराळ भाग हे या सापाचं आवडतं ठिकाण. दाट जंगलात राहणे मात्र याला आवडत नाही.

रचना - फुरसे ची लांबी ४६ - ५५ सेंमी. किंवा अधिक असते. ७९ सेंमी. लांबीचे नमुनेही आढळतात. तपकीरी किंवा रेतीच्या रंगाच्या या सापाच्या पाठीवर शंकरपाळ्यांसारखी सुंदर नक्षी असते. माने पेक्षा डोकं मोठं, त्रिकोणी आणि त्यावर बाणासारखी खूण (↑) असते. डोळे बटबटीत असतात.पोटाचा रंग पांढरा असतो. शेपूट लहान असते. मादा एप्रिल ते ऑगस्टदरम्यान पिल्लांना जन्म देतात. मादा एका वेळी ३ ते १५ पिल्लांना जन्म देते.पिल्लांची लांबी ११५ ते १५२ मिमी असते.

खाद्य - उंदिर, पाली, बेडूक, सरडे, छोटे साप, विंचू, किडे हे या सापाचं प्रमुख खाद्य.

अत्यंत जलद गतीनं हा साप दंश करतो. याचं विषही रक्तपेषींवर आघात करतं. फुरसे चे विष नागाच्या विषाच्या पाचपट आणि घोणसाच्या विषाच्या सोळापट जहाल असते.घोणस (Russell's viper) – व्हायपर या सर्पांच्या प्रकारात घोणसाचा समावेश होतो.या प्रकाराचे सगळे सर्प विषारी असतात. एकूण ४२ जातींपैकी ७ भारतात आहेत. या सातांमध्ये घोणस आणि फुरसे या दोन मुख्य आहेत.घोणसाचे फुत्कार एखाद्या कुकराच्या शिट्टीप्रमाणे असतात.

Indian Russell viper घोणस

वास्तव्य - उघडी जागा आणि जंगल त्याला विशेष पसंत पडते.दिवसा अंगाचे वेटाळे करून झुडपात किंवा गवतात तो स्वस्थ पडल्यासारख्या दिसतो, पण तो अतिशय जागरूक असतो. संध्याकाळ झाल्यावर किंवा रात्री भक्ष्य शोधण्याकरिता तो बाहेर पडतो.

रचना - घोणस ची लांबी . १·६ मी. - १. ९ मी असते यांचे डोके काहीसे तिकोनी, रुंद व चपटे असते आणि त्यावर लहान टिकल्यांसारखे खवले असतात, तसेच रेषा किंवा खुणा असतात आणि Λ अशा आकाराची तांबूस रंगाची खूण नेहमी असते. घोणस च्या नाकपुड्या इतरांपेक्षा बऱ्याच मोठ्या असतात. डोळे मोठे असतात. बाहुली अंडाकार उभी असते आणि तिच्या भोवतालच्या पडद्यात लहान लहान सोनेरी कण असतात. पोटाचा रंग पांढरा असतो. बाकी विषारी सापांच्या तुलनेत त्यांचे विषदंत मोठे सुमारे १३ मिमी. लांब असतात. मान बारीक असते शरीर जाड आणि गुबगुबीत असून शेपूट लहान असते. आश्चर्य म्हणजे घोणस पोटामध्ये अंडी उबवतो व पिल्ले अंड्यांतून बाहेर आल्यानंतर बाहेर काढतो. त्यामुळे कित्येकांचा असा ग़ैरसमज आहे, की घोणस सस्तन प्राण्यांप्रमाणे पिल्लांना जन्माला घालतात. एका मादीने तीन दिवसांत ९७ पिल्लांना जन्म दिल्याचेही आढळते. जन्मतः पिल्ले ११–१३ सेंमी. लांब असतात. तसेच मोठया सापांप्रमाणे विषारी देखील असतात.

खाद्य - उंदीर हे त्याचे आवडते खाद्य असल्यामुळे पुष्कळदा तो घराच्या आसपास किंवा घरातही आढळतो.

हा साप सहसा माणसाला चावत नाही. पण जर माणसाने डिवचल तर जमिनीवरून जोरात उडी मारून कडकडून चावतो. चावा इतका घातक असतो की दंश झालेली जागा काळीनिळी होते आणि सुजते. घोणस चावल्यानंतर जखमेभोवती कोणत्याही प्रकारची पट्टी लावू नये. तसे केल्यास रक्त साखळते आणि तो भाग कायमचा निकामी होऊ शकतो. माणसाला त्रास असह्य होऊन काही तासांतच तो मरतो. जर अंगात जास्त विष गेलेले नसेल, तर माणूस काही दिवस जगतो. घोनस चावल्यानंतर त्या व्यक्तीस पाणी प्यायला देऊ नये.
सर्पदंश कसा टाळावा ?  

()घराच्या जवळपास कौले, केरकचराविटा आणि अशा गोष्टी ठेऊ नयेत ज्या ठिकाणी साप आसरा घेतात(घराजवळ झाडे असतील  त्यांच्या फांद्या घरावर आलेल्या असतील तर साप त्यावरून घरात येऊ शकतात.  (रात्री  फिरताना  बॅटरी घेऊन  फिरावे.  (साप दिसताच त्याला विनाकारण मारु नये. अशावेळी तो स्वतःचा बचाव करण्यासाठी चावू शकतो.  (अंधारात चालण्याचा प्रसंग आल्यास पाय किंवा काठी आपटत चाला,  त्यामुळे जमिनीत कंप निर्माण होऊन साप   जवळ येणार नाहीत.   ()

घराशेजारी लाकूड किंवा गवत साठवून ठेऊ 
नये, जर असतील तर त्या वस्तू काढताना काळजी घेऊन काढाव्यात.  () झोपताना खाली भिंतीच्या कडेला झोपू नये. (कॉट किंवा पलंगावर झोपावे.  ()जंगलात फिरताना डोक्यावर टोपी   पायात बूट घालावेत(१०) मांजर  कुत्री हे आसपासच्या सापांच्या अस्तित्वाची जाणीव करून देतातमांजर अंधारातदेखील सापाला ओळखू शकते तसेच कुत्री वासावरून सापाचे अस्तित्व ओळखतात


सापाचे शत्रू :

साप हे मुंगसाचे आवडते भक्ष्य आहेसापाबद्दल असलेल्या गैरसमजुती  भीती यांमुळे मानवाकडून साप मोठ्या प्रमाणावर मारले जातातयामुळे मानव हा सापाचा प्रमुख शत्रू आहे. सापांच्या कातडीचा लोक व्यापार करतात. कातडीसाठी सापांना मारतात. बहिरी ससाणा, घुबड, बगळा, करकोचा गरुड यांसारखे पक्षी सापाना मारून खातात.


सापाचे स्वरक्षण :

साप स्वसंरक्षणासाठी निरनिराळ्या युक्त्या करतातअजगर, फुरसे यांसारखे साप जोरजोराने फुत्कार सोडतात. नागासारखे साप फणा काढून आपली मान उंच करून शत्रूला भीती दाखवितात. तो चपळाईने फणा काढून शत्रूवर आक्रमण करतो. बिनविषारी पाण-सापदेखील फणा काढल्यासारखे डोके आणि मान उंचावतात आणि फुत्कार सोडतात. काही साप शत्रू त्यांच्यापासून दूर जाईपर्यंत निपचित पडून राहतात, तर काही जमिनीवर अंगाचे वेटोळे करून  पडून राहतात. काही साप पकडताच स्वसंरक्षणासाठी दुर्गंधी सोडतात. त्यांना डिवचले, त्यांच्यावर पाय पडला किंवा इजा केली तर ते चावा घेतात. साप शक्यतो मानवापासून दूर राहण्याची काळजी घेतात.


सापाचे महत्त्व :

() साप हा महत्त्वाचा प्राणी आहे. भारतात उत्पादित होणाऱ्या अन्नधान्यांपैकी २७% धान्य उंदीर खातात आणि त्याची नासाडी करतात. सापाच्या खाद्यामध्ये प्रामुख्याने उंदीर घुशी यांचा समावेश होतो. धामण एका वर्षात अंदाजे २५० उंदीर खाते. उंदराच्या एका जोडीपासून दरवर्षी सुमारे ८८८ पिले होतात यावरून उंदरांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी सापाचे किती महत्त्व आहे हे लक्षात येते. () पूर्वी सापाच्या कातडीपासून कमरेचे पट्टे, पाकिटे, बूट खेळणी अशा विविध वस्तू बनवीत. (सापाच्या चरबीपासून तयार केलेले तेल मालीश करण्यासाठीत्वचारोगसांधेदुखी  स्नायुदुर्बलता यांवरील उपचारांसाठी वापरतात. (प्रतिविष तयार करण्यासाठी सापाचे विष वापरतात. () सापाच्या विषाचा उपयोग आयुर्वेदात आणि होमिऑपथीमध्ये औषधे तयार करण्यासाठी करतात. ()विविध  रोगावर रक्त गोठविण्यासाठी घोणसाच्या विषाचा उपयोग केला जातो. () मलायन पाम्बो तांबुल सापांच्या मांसाची पावडर महारोगावर औषध म्हणून बऱ्याच देशांत वापरतात.


सापाबद्दलच्या गैरसमजुती :

() सापाच्या नर-मादीच्या जोडीपैकी एकाची हत्या केली, तर दुसरा साप त्याचा सूड घेतो. () सापाला दूध आवडते. () सापाला संगीत आवडते. (नाग गुप्तधनाचे संरक्षण करतो. (५) सापाच्या डोक्यावर रत्न किंवा मणी असतो आणि डोक्यावर केस किंवा कोंबड्यासारखा तुरा असतो. ()  धामण पाहिल्यावर म्हैस अथवा गाय दूध देत नाही  ती मरते () वेल्या साप माणसाच्या डोक्यावर आघात करतो किंवा कपाळावर दंश करतो. () मांडवळ जातीच्या सापाने एखाद्याचे अंग चाटले ,तर त्याला कुष्ठरोग होतो. () सापाने दंश केलेल्या व्यक्तीची प्रेतयात्रा दहन संस्कार तो साप झाडावरून पाहत असतो, अशी दक्षिण भारतातील लोकांची धारणा आहे. (१०साप इच्छेनुसार रूप धारण करू शकतो. (११) अंगावर कडे असलेल्या सापाने एखाद्या व्यक्तीला दंश केलाच, तर त्या व्यक्तीच्या अंगावर तसेच कडे उमटतात. (१२) मण्यार साप झोपलेल्या माणसाचा श्वास शोषून घेत असतो. (१३) फुरसे जमिनीवरून सुमारे  मी. किंवा त्यापेक्षा जास्त उंच उडी घेऊ शकतात. (१४) नागाचा समागम धामणीशी होतो. (१५) मंत्रतंत्रांनी सर्पविष उतरविता येते. (१६) तांबडा मांडवळ साप दुतोंडी असतो. (१७) सापांना सुगंधाचे आकर्षण असते. (१८पट्टेदार साप चावल्यास व्यक्तीच्या अंगावर चट्टेपट्टे उमटतात. (१९) सापाला जखम झाल्यास त्याला मुंग्या लागून साप मरतो. (२०नुकत्याच मारलेल्या सापावर रॉकेल ओतल्यास तो साप जिवंत होतो. (२१) दंश झालेल्या व्यक्तीस कडुलिंबाचा पाला खायला देतात, त्यामुळे विष उतरते. (२२) सापाचे विषारी दात काढल्यास त्यापासून कोणताही धोका नसतो. (२३) कुष्ठरोग (महारोग) झालेल्या व्यक्तीस नागाने दंश केल्यास तो बरा होतो.  या सर्व गैरसमजुती  अंधश्रद्घा असून त्यांस कोणताही वैज्ञानिक आधार नाही.

विषबाधेची लक्षणे:

सर्पदंशामध्ये पायावरील दंशाचे प्रमाण अधिक असून हातावर दंशाचे प्रमाण त्यामानाने कमी असते. मेंदूकडे रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिनीवर जर दंश झाला पुरेसे विष गेले तर  ती  व्यक्ती - मिनिटांत मरण पावते. फुरशाचे विष रक्ताभिसरण तंत्रात मिसळले, तर ती व्यक्ती चटकन मरण पावते.  व्यक्तीला विषबाधा झाल्यास पुढील लक्षणे दिसतात.

नाग : () दंशाच्या जागी सहा ते आठ मिनिटांत तांबूस पुरळ दिसू लागतात आणि खाज सुटते जळजळ सुरू होते. () सुमारे २५ मिनिटांनी रोग्यास झोप आल्यासारखे वाटुन गुंगी येऊ लागतेत्याला हालचाल करण्याची किंवा चालण्याची इच्छा राहत नाही. () दंशानंतर ३५ – ५० मिनिटांनी तोंडातून लाळ बाहेर पडतेशरीर जड होतेजीभ घसा सुजतो, त्यामुळे बोलता येत नाही. अन्न खाता येत नाही. () दोन तासांनी अर्धांगवायूची बाधा होतेश्वसनक्रिया मंद होत जातेहृदयाचे ठोके जलद पडू लागतात. () श्वसनक्रिया आकडी येऊन थांबते त्यापाठोपाठ हृदयक्रिया बंद पडते.

मण्यार : () दंशाच्या जागी तांबूस पुरळ दिसू लागतात, परंतु त्या जागी सूज किंवा जळजळणाऱ्या वेदना होत नाहीत. () आकडीचे  सौम्य झटके असतातसुस्ती गुंगी तीव्र स्वरूपाची येते. () जवळपास सहा तासानंतर पोटात सांध्यांना अतिशय वेदना होतात.

घोणस फुरसे : () दंशाच्या जागी जवळपास ८-१० मिनिटांत तीव्र वेदना जळजळ सुरु होते. दंशाभोवतालची जागा सुजून लाल दुखरी होते.  () पंधरा मिनिटांच्या आत सूज वाढू लागतेजखमेतून रक्त दूषित स्राव वाहू लागतो. () तीव्र वेदना सुरू होतातअंगावर काटा उभा राहतोओकाऱ्या येऊन घाम सुटतोडोळ्यांच्या बाहुल्या विस्फारतात त्या प्रकाशाला प्रतिसाद देत नाहीत. ( ) एक-दोन तासांत रुग्ण बेशुद्ध पडतो. ()जखमेतून पुरेसे रक्त वाहून गेल्यावर जखमेच्या जागी सूज येते आणि ती जवळच्या भागात पसरतेजखमेच्या जागी पू होतो त्वचा कुजू लागते. () आतड्यातून दातांच्या हिरड्यांतून सुद्धा रक्त वाहू लागते

विष नक्की कसे बनते ?

अन्नाचं पचन करण्यासाठी प्रत्येक प्राण्यामध्ये निसर्गानं एक पदार्थ दिला आहे. त्याला आपण लाळ म्हणतो. सर्पविष हा त्यातलाच प्रकार. आपल्या तोंडात जशा लाळीच्या ग्रंथी असतात अगदी तशाच प्रकारे सापाच्या तोंडात विषग्रंथी असतात. 

विषारी, बिनविषारी आणि निमविषारी असे सापांचे ३  प्रकार आहेत. या प्रकारांनुसार त्यांच्या पचनसंस्थेत थोडाफार फरक असतो.

विषारी सापांच्या टाळूनजीक एक पोकळ पिशवी असते तिला "विषग्रंथी" असे म्हणतात. या विषग्रंथीमध्ये विषाची निर्मिती होते. हे विष अनेक घटकांपासून तयार होत आणि सापाला पाचक रसाप्रमाणे मदत करत. भक्ष मारण्यासाठी आणि त्याच पचन व्यवस्थीत करण्यासाठी या पाचक रसाची म्हणजेच विषाची मोठी मदत होते

सापाच विष किंचीत पिवळसर असतकाही सापांमध्ये हा पिवळा रंग थोडा गडद पहायला भेटतो. यात रायबोफ्लाविन (Riboflavin जीवनसत्व बी-2 असत. हे कडधान्यातही असतं. खाल्लेलं अन्न पचवण्यास याची मदत होते.) त्यामुळे सापाच्या विषाला असा रंग प्राप्त होतो. काही सापांचं विष रंगहीन देखील असतं. सापाचं विष पाण्यापेक्षा किंचीत जड असतं. 

या विषाची चव कशी असते ?

हिवाळ्यात घोणस, फुरसे इ. सापांचं विष अधिक जाड होतंसापाचं विष हे जरा तुरट आणि कडवट असते. त्याला कोणताही वास नसतो. या विषाचा मानवाच्या रक्तप्रवाहाशी संपर्क आला तरच त्याचे दुष्परीणाम शरीरात दिसू लागतात. म्हणजे जर  तोंडात किंवा आतड्याला कोणतीही जखम नसेल तर तोंडावाटे सापाच विष सहज पचवल जाऊ शकते. पण जर तोंडात किंवा शरीरात जखम असेल (दाताला किड असेल) तर 
माणूस दगावु शकतो.
 विष शरीराच्या डोळ्यांसारख्या नाजूक अवयवावर पडल तरी सुद्धा माणूस दगावु शकतोया विषाचा अभ्यास करण्यासाठी ते सुकवल जात. विष सुकवण्याच्या या प्रक्रियेला लायोफ्रिझेशनLyophilization ) असे म्हणतात. 

यामधे  सर्पविष गोठवल जात आणि त्याचे स्फटीक बनतात. हे स्फटीक पाण्यात टाकले की ते पुन्हा त्याच्या मुळ रुपात येतात. विष गरम केल्यास त्याचे स्फटीक बनतात पण त्यातले अनेक घटक नष्ट होतात. हे विष प्रत्येक जातीच्या सापात वेगळ्या प्रकारचं असतंमज्जासंस्थेवर
आघात करणारं (Neuro toxic) हे विष प्राण्याच्या मज्जासंस्थेवर आघात करतं उदा. नाग, मण्यार . आणि रक्ताभिसरण संस्थेवर आघात करत ते (Hemo toxic) उदा. घोणस, फुरसे . यातील कोणत्या जातीचा साप चावला आहे त्या आधारे व्यक्तीला / प्राण्याना प्रतिसर्पविष दिलं जातं

सर्पदंशावरील प्रतिविष कधी दयावे ?

विषारी साप चावल्यावर त्यावर उपाय म्हणून प्रतिविष टोचावे लागतेहे प्रतिविष भारतात "हाफकिन इन्स्टिट्यूटमुंबई" या संस्थेत तयार केले जातेसर्पदंश झालेल्या व्यक्तीस हे प्रतिविष १० मिलीशिरेतून लवकरात लवकर द्यावे. एका तासाने माणसात विषबाधेची लक्षणे जर पुन्हा आढळत असल्यास प्रतिविषाची दुसरी मात्रा द्यावीफुरसे चावल्यास सर्पदंशाच्या  जखमेभोवती थोडेप्रतिविष टोचावे लागते,  त्यामुळे जखम चिघळत नाहीविषबाधेची लक्षणे जोपर्यंत आढळताततोपर्यंत दर   दोन तासांनी प्रतिविषाची  इंजेक्शने द्यावी लागतात.Post a Comment

7 Comments

 1. Nice information 👌👌😊

  ReplyDelete
 2. Thanks!!
  You Gave Very Useful Information.

  ReplyDelete
 3. तुमची माहिती खूप उत्तम आहे.

  ReplyDelete
 4. Thanks for giving such a brilliant information 😊

  ReplyDelete
 5. खुप छान👌 नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा😄

  ReplyDelete
 6. Thank ubfor this info 🥰😘

  ReplyDelete

If you have any suggestions, Please let me know !